दाखल्यासाठी नागरिक हैराण
By admin | Published: May 5, 2014 10:19 PM2014-05-05T22:19:03+5:302014-05-06T17:20:23+5:30
सेतूमध्ये अर्जांचे ढिगारे; तपासणी व सांसाठी कर्मचारी नाहीत
सोलापूर: सोलापूर सेतू कार्यालयात तहसीलचे कर्मचारी नसल्याने तसेच सेतूने तयार करुन दिलेल्या दाखल्यावर सा करण्यासाठी उत्तर तहसील कार्यालयात कोणीच नसल्याने विविध प्रकारच्या दाखल्यांच्या अर्जांचे ढिगारे पडले आहेत. दाखल्यासाठी नागरिकांना पुन्हा त्रास सुरू झाला आहे.
मागील वर्षी दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व सोलापूर शहरसाठीच्या सेतूमध्ये विविध प्रकारच्या दाखल्यांवरुन गोंधळ निर्माण झाला होता. अनेक प्रकरणे गहाळ झाली होती तर अनेक प्रकरणांवर अधिकार्यांच्या साच होत नव्हत्या. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी महसूलचे अधिक कर्मचारी नियुक्त करुन दाखल्यांचा काही अंशी प्रश्न मार्गी लावला होता.
उत्तरचे तहसीलदार अनिल कारंडे लोकसभा मतदानानंतर दोन वेळा रजेवर गेले. नायब तहसीलदार हिरेकेरुर हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले तर किरण जमदाडे हे दीर्घ रजेवर गेले आहेत. सेतू कार्यालयातील विष्णू लोंढे हे मुलीच्या लग्नासाठी रजेवर, संतोष जाधव हे आजारी रजेवर गेले आहेत. प्रतिज्ञापत्रावर सही करण्यासाठीही एकच कर्मचारी आहे. सेतूमध्ये अर्ज तपासणीला, त्रुटी काढण्यासाठी व तहसीलमध्ये सा करण्यासाठी कोणीच नसल्याने अर्जांचे ढिगारे पडले आहेत.
० ३० तारखेनंतरच्या उत्पन्नाच्या (एक वर्षाच्या) दाखल्यावर सा नाहीत
० नॉन क्रिमेलियरच्या १६ एप्रिलनंतरच्या दाखल्यांवर सा होईनात
० रहिवासीचे १० दिवसांचे दाखले पेंडिंग
० तहसीलकडून दाखले पुढे जात नसल्याचे प्रांताधिकार्यांकडेही दाखले पडून