नागरिकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’साठी दक्षता घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:27 AM2021-08-14T04:27:11+5:302021-08-14T04:27:11+5:30

मंगळवेढा : कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे ते ...

Citizens should be vigilant for 'my family, my responsibility' | नागरिकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’साठी दक्षता घ्यावी

नागरिकांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’साठी दक्षता घ्यावी

Next

मंगळवेढा : कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे; परंतु लसीच्या तुटवड्यामुळे ते शक्य होत नाही. देशातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले तर आपण निश्चितपणे कोरोना संकटातून बाहेर पडणार आहोत. यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याप्रमाणे आवश्यक ती उपाययोजना करावी, असे मत ऋषिकेश परिचारक यांनी व्यक्त केले.

कर्मयोगी फाउंडेशन व युटोपियन शुगर्सतर्फे स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे प्रथम पुण्यस्मरण व युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपियन शुगर्स येथे मोफत कोरोना लसीकरण शिबिर घेण्यात आले. यावेळी कर्मयोगी फाउंडेशनचे प्रमुख ऋषिकेश परिचारक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक सी. एन. देशपांडे यांच्यासह सर्व खाते-प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळी :::::::::::::::::::::

युटोपियन शुगर्स येथे मोफत लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ऋषिकेश परिचारक, सी. एन. देशपांडे व अन्य.

Web Title: Citizens should be vigilant for 'my family, my responsibility'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.