‘ई-पास’साठी नागरिकांची भ्रमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:22 AM2021-04-25T04:22:28+5:302021-04-25T04:22:28+5:30

नागरिकांना ई-पास घेण्यासाठी ठरावीक संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा लागतो. यामध्ये सरकारी मेडिकल ऑफिसरचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक मानले जाते. मात्र, ...

Citizens wandering for ‘e-pass’ | ‘ई-पास’साठी नागरिकांची भ्रमंती

‘ई-पास’साठी नागरिकांची भ्रमंती

Next

नागरिकांना ई-पास घेण्यासाठी ठरावीक संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा लागतो. यामध्ये सरकारी मेडिकल ऑफिसरचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक मानले जाते. मात्र, तालुक्यात या प्रमाणपत्रासाठी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देऊन वरिष्ठांकडून अद्याप आदेश आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच काही नागरिक पुरंदावडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता त्यांना ही सुविधा सध्या आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा नागरिकांना भ्रमंती करावी लागत आहे.

कोट :::::::::::::::::::::

नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी जिल्हा बदली करताना ई-पासची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबतीत आरोग्य विभागाने लक्ष घालून वैद्यकीय प्रमाणपत्राबाबतचा तोडगा काढणे आवश्यक आहे.

- उपेंद्र केसकर,

तालुकाध्यक्ष, ग्राहक पंचायत

कोट :::::::::::::::::

ई-पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र खाजगी डॉक्टरांचे घेतले तरी चालते. यात सरकारी वैद्यकीय अधिकारी गुंतले तर इतर कामाचा ताण पडणार आहे. त्यामुळे याबाबत अडचण येणार नाही.

- प्रदीप ढेले,

जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Citizens wandering for ‘e-pass’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.