‘शहर मध्य’च्या मताधिक्याने सारेच बुचकळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 01:17 PM2019-05-25T13:17:22+5:302019-05-25T13:22:32+5:30

सोलापूर लोकसभा निवडणुक विश्लेषण; आमदार प्रणिती शिंदे यांनी होम टू होम भेटी दिल्या. विविध कार्यक्रमांमधून लोकांच्या संपर्कात राहिल्या. तरीही निवडणूक निकाल धक्कादायक ठरले आहेत. 

In the city center, all the buzz in the ball | ‘शहर मध्य’च्या मताधिक्याने सारेच बुचकळ्यात

‘शहर मध्य’च्या मताधिक्याने सारेच बुचकळ्यात

Next
ठळक मुद्देभाजपला या मतदारसंघात अनपेक्षितपणे मिळालेले मताधिक्य पाहून काँग्रेसबरोबर भाजप नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले शहर मध्यमध्ये काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, सेनेचे २ आणि भाजपचे १४ नगरसेवक आहेतनीलमनगर, आकाशवाणी, विनायकनगर या प्रभागातून भाजपला ११ हजार ७९३ तर काँग्रेसला फक्त १५८८ इतके मतदान झाले

राजकुमार सारोळे

सोलापूर - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाºया शहर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या भागात भाजपच्या उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना  शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोटमधून मताधिक्य मिळाले. शहर मध्य मतदारसंघाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या करीत आहेत. निवडणूक प्रचारात त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत होम टू होम भेटी दिल्या.  विविध कार्यक्रमांमधून लोकांच्या संपर्कात राहिल्या. तरीही निवडणूक निकाल धक्कादायक ठरले  आहेत. 

काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांच्या प्रभागात पाटील चाळ, जुनी मिल चाळ, एनजी मिल चाळ, जैनुद्दीन चाळ, क्लार्क चाळ या परिसरातून भाजपला ३८३९ तर काँग्रेसला २४८३ इतके मतदान झाले आहे. जेलरोड, विजापूर वेस परिसरात भाजपला १३२६ तर काँग्रेसला ३३१० इतके मतदान झाले आहे. दाजीपेठ, दत्तनगर, फलमारी झोपडपट्टी या ठिकाणी भाजपला ४२५७ तर काँग्रेसला २४०५ इतकी मते मिळाली आहेत. व्यंकटेश्वर झोपडपट्टी, कुचननगर, कर्णिकनगर, शासकीय तंत्रनिकेतन परिसरातही भाजपला चांगले मताधिक्य मिळाले आहे. 

काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जनवात्सल्य हे निवासस्थान असलेल्या सोलापूर सोसायटी, सातरस्ता, गांधीनगर, विकासनगर, आयकर सोसायटी, महिला हॉस्पिटल, केशवनगर पोलीस वसाहत या भागात भाजपला मताधिक्य आहे.

 भाजपला ३१३६ तर काँग्रेसला २५५९ इतकी मते मिळाली आहेत. त्यानंतर शानदार चौक, मौलाली चौक, शास्त्रीनगर, मोदी परिसरात काँग्रेसला बºयापैकी मतदान झाले आहे. या भागाचे प्रतिनिधित्व काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल या करतात. नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या प्रभागात आंबेडकर प्रशाला, कोनापुरे चाळ येथून काँग्रेसला बºयापैकी मतदान झाले आहे.  एकंदरीत कल पाहता सारेच बुचकळ्यात पडले आहेत.

काय आहे परिस्थिती
शहर मध्यमध्ये काँग्रेसचे ४, राष्ट्रवादीचे २, सेनेचे २ आणि भाजपचे १४ नगरसेवक आहेत. नीलमनगर, आकाशवाणी, विनायकनगर या प्रभागातून भाजपला ११ हजार ७९३ तर काँग्रेसला फक्त १५८८ इतके मतदान झाले आहे. या ठिकाणी भाजपचे नगरसेवक श्रीनिवास करली, अनिता कोंडी, वरलक्ष्मी पुरूड, सेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर हे प्रतिनिधित्व करतात. मोदी, रामवाडी, लिमयेवाडी या परिसरातून भाजपला २२०७ तर काँग्रेसला २६९२ इतकी मते मिळाली आहेत.

नगरसेवकांना वाटते आश्चर्य
भाजपला या मतदारसंघात अनपेक्षितपणे मिळालेले मताधिक्य पाहून काँग्रेसबरोबर भाजप नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नागेश वल्याळ म्हणाले, या मतदारसंघातून पाच हजारांची लीड देतो, असे म्हणाल्यावर आमचे नेते हसले होते. काँग्रेसला बालेकिल्ल्यात लीड कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. पण इतके मताधिक्य पाहून मला आश्चर्य वाटत आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक मेघनाथ येमूल म्हणाले, प्रचारात मी घरोघरी फिरलो, पण झोपडपट्टीतून भाजपला मागील वेळेपेक्षा जास्त मतदान कसे झाले याचे आश्चर्य वाटत आहे. नगरसेवक विनोद भोसले, चेतन नरोटे म्हणाले, मी जिथे राहतो तेथे भाजपला जास्त मतदान कसे होईल. 

Web Title: In the city center, all the buzz in the ball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.