कुर्डूवाडी शहराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:22 AM2021-05-26T04:22:52+5:302021-05-26T04:22:52+5:30
शहरात ११ कंटेन्मेंट झोन होते. ते आता केवळ ४ सक्रिय राहिले आहेत. शहरातील ४,४२६ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली ...
शहरात ११ कंटेन्मेंट झोन होते. ते आता केवळ ४ सक्रिय राहिले आहेत. शहरातील ४,४२६ लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यात ५६८ जण बाधित रुग्ण आढळून आले होते. ४९३ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. आता सौम्य लक्षणे असलेले ४७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे शहर कोरोना मुक्त होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. शहराला कोरोनामुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष समीर मुलाणी, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, मुख्याधिकारी समीर भूमकर, आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी व त्यांच्या अनेक कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
----
नगरपालिकेची कारवाई
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांना सुरुवातीला गांधीगिरी करत मास्क वाटप केले होते. नंतर दंडात्मक कारवाई करून ४५०० रुपये दंड वसूल करण्यात आला, याशिवाय निर्धारीत वेळेपेक्षा अधिकवेळ दुकान व्यावसायिकांना एकूण १७ हजाराचा दंड केला आहे. बाधित असून मोकाट फिरणाऱ्या एकावर पोलीस केस दाखल केली. अशाप्रकारे एकूण २२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
------
शहरात बेडची सद्यस्थिती-
कुर्डूवाडी शहरात बोबडे, साखरे, आधार, अपूर्वा, सर्वेश या सर्व डेडीकेटेड सेंटर व श्रीराम व महिला हाॅस्टेलमधील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या व्हेंटिलेटर बेड-१, आक्सिजन-२० बेड, जनरल-११० बेड शिल्लक आहेत.
---
कुर्डूवाडी शहरात सध्या ४७ रुग्ण सौम्य लक्षणे असलेली आहेत. त्यामुळे त्यांचा उपचार कालावधी संपला की त्यांना दोन दिवसांत घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहर कोरोना मुक्तीकडे वाटचाल करू लागले आहे असे म्हणायला हरकत नाही. तरीही सर्वांनी काळजी घ्यावी.
समीर भूमकर, मुख्याधिकारी, नगरपालिका कुर्डूवाडी