सोलापूर शहरात पोलीसाच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:47 PM2018-03-26T14:47:47+5:302018-03-26T14:47:47+5:30
पिडीत मुलीच्या वडिलाची पोलीसात तक्रार, गुन्हा दाखल
सोलापूर : अल्पवयीन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसाच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना सोलापूर शहरात असलेल्या सरस्वती चौकातील सेवासदन प्रशालेसमोर घडली.
याबाबत पिडीत मुलीच्या वडिलांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी रुषीकेश राजेद्र गायकवाड (रा. किल्ला पोलीस लाईन, सोलापूर) याच्या विरुध्द ३५४ (डी), ५०६ सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीची मुलगी ही शाळेकडून सोलापूर डिस्ट्रिक्ट हॉलीबॉल असोसियशन तर्फे हॉलीबॉल खेळण्यासाठी पार्क स्टेडियम येथे जात होती. त्याच ठिकाणी संगमेश्वर कॉलेजकडून रुषीकेश गायकवाड हा देखील हॉलीबॉल खेळण्यासाठी येथे दररोज येत असे. त्यावेळी फिर्यादीच्या मुलीची आणि आरोपीची ओळखी झाली होती़ आरोपी हा फिर्यादीच्या मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत असे.
फिर्यादीनी हा सगळा प्रकार आरोपीच्या वडीलांना एक महिन्यापुर्वी सांगितले होते. त्यांनी मुलाला ताकीद देतो असा प्र्रकार होणार नाही असे म्हणाल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. मात्र त्यानंतरही आरोपीने १९ मार्च २०१८ रोजी शाळेत येऊन पिडीत मुलीला मोबाईल दिला, तु जर कोणाला सांगितले तर तुला बघुन घेईन अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.