मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; १४ जणांवर गुन्हे

By काशिनाथ वाघमारे | Published: May 22, 2023 07:03 PM2023-05-22T19:03:28+5:302023-05-22T19:04:00+5:30

मंगळवेढा तालुक्यात सलगर खु. येथे शेतजमिनीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली.

Clash between two groups due to agricultural dispute in Mangalvedha Crimes against 14 persons | मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; १४ जणांवर गुन्हे

मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; १४ जणांवर गुन्हे

googlenewsNext

सोलापूर: मंगळवेढा तालुक्यात सलगर खु. येथे शेतजमिनीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या प्रकरणात एकमेकांविरुद्ध १४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार पहिल्या घटनेत २१ मे रोजी यातील फिर्यादी दयानंद विठ्ठल कोळी शेतामध्ये ट्रॅक्टरने मशागत करीत होते. यादरम्यान आरोपीने येऊन हे शेत आमचे आहे, तू शेतात मशागत करायची नाही म्हणत फिर्यादीच्या गच्चीला धरून मारहाण करू लागले. 

त्यावेळी फिर्यादी आरडाओरडा करीत असताना आवाज ऐकून आई मंगल कोळी, भाऊ विशेष कोळी हे भांडणे सोडविण्यासाठी आले असताना आई मंगल हिच्या डोक्यात सत्तूरने मारून गंभीर जखमी केले. विहिरीवर पडलेला गज घेऊन फिर्यादीच्या कपाळावर उजव्या बाजूस मारून त्यांनाही गंभीर जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी शिवाजी भुसनर, संतोष काटकर, सिद्धेश्वर भुसनर, अमित काटकर, प्रवीण दबडे, प्रदीप भुसनर, वैभव भुसनर, कोंडीबा काटकर, बाळासाहेब काटकर या नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत फिर्यादी संतोष जालिदर काटकर हे २१ मे रोजी सकाळी १०:३० वाजता खरेदी केलेल्या शेतामध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरत असताना फिर्यादी व फिर्यादीच्या आईने आरोपीस या जमिनीचा वाद कोर्टात सुरू आहे. तू जमीन नांगरू नकोस असे विचारले असता आईला लिंबाच्या काठीने उजव्या हाताच्या मनगटावर मारून जखमी केले. ही भांडणे सुरू असताना आरोपीने तेथे येऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तुम्हाला येथे ठेवणार नाही असे म्हणून आरोपीने विळ्याने नंदिनी हिच्या डाव्या हातावर मारून जखमी केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी दयानंद कोळी, विशेष कोळी, मंगल कोळी, सुप्रिया कोळी, जुई कोळी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे व पोलिस हवालदार दत्तात्रय येलपले करीत आहेत.

Web Title: Clash between two groups due to agricultural dispute in Mangalvedha Crimes against 14 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.