लोकसहभागातून सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार जलस्त्रोतांची स्वच्छता
By Appasaheb.patil | Published: August 25, 2023 07:25 PM2023-08-25T19:25:00+5:302023-08-25T19:25:28+5:30
सोलापूर जिल्ह्यात जलस्त्रोतांची संख्या ९ हजार ७५६ असून यामधील जवळपास ३ हजार २५७ पेक्षा अधिक जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यात आली.
सोलापूर : जिल्ह्यात ओडीएफ प्लसला गती देणे साठी राबविण्यात येणारे विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत सर्व जिल्हयात सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली होती. ३ हजार २५७ पेक्षा अधिक सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.
प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी शनिवारी सुट्टीचे दिवशी बैठक घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांना जलस्त्रोतांच्या सुरक्षिततेसाठी सक्त सुचना दिलेल्या आहेत. हरघर जल गाव घोषीत करताना जलस्त्रोतांची स्वच्छता पाहिली जाते.
सोलापूर जिल्ह्यात जलस्त्रोतांची संख्या ९ हजार ७५६ असून यामधील जवळपास ३ हजार २५७ पेक्षा अधिक जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यात आली. या बरोबर टीसीएल ठेवण्याची जागा देखील स्वच्छ करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी जलस्त्रोताचा परिसर खराब असलेले ठिकाणी पावसामुळे वाढलेले गवत, कचरा हटविण्याचे काम या अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली.