श्रमदानातून जलस्त्रोतांची स्वच्छता; जिल्हा परिषद राबविणार विशेष मोहिम

By Appasaheb.patil | Published: August 24, 2023 07:30 PM2023-08-24T19:30:20+5:302023-08-24T19:30:42+5:30

सोलापूर जिल्हात  जलस्त्रोतांची संख्या ९७५६ असून ज्या ठिकाणी जलस्त्रोताचा परिसर खराब आहे

Cleaning of water bodies through labor; Special campaign to be implemented by Zilla Parishad | श्रमदानातून जलस्त्रोतांची स्वच्छता; जिल्हा परिषद राबविणार विशेष मोहिम

श्रमदानातून जलस्त्रोतांची स्वच्छता; जिल्हा परिषद राबविणार विशेष मोहिम

googlenewsNext

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : जिल्ह्यात ओडीएफ प्लसला गती देण्यासाठी राबविण्यात येणारे विशेष स्वच्छता अभियान अंतर्गत उद्या शुक्रवार २५ ऑगष्ट रोजी सार्वजनिक जलस्त्रोतांची स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.  

सोलापूर जिल्हात  जलस्त्रोतांची संख्या ९७५६ असून ज्या ठिकाणी जलस्त्रोताचा परिसर खराब आहे. अशा ठिकाणी या अभियान अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. या जलस्त्रोताच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थ व कर्मचारी सहभागी होत आहेत. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी सक्त सुचना दिलेल्या आहेत. जलस्त्रोताचे परिसर स्वच्छ केल्यामुळे जलस्त्रोत बाधीत होणार नाही, याची काळजी घेण्याचा उद्देश्य या अभियानाचा आहे.  गावात जलस्त्रोताचे बाजूस कुठल्याही प्रकारे कचरा किंवा घाण त चे सांडपाणी त्यात मिसळणार नाही याची काळजी घ्यावयाची आहे. श्रमदानातून ही मोहिम हाती घेणेत येत आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता या मोहिमेत करण्यात येत असल्याचेही पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

Web Title: Cleaning of water bodies through labor; Special campaign to be implemented by Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.