तुंबलेल्या गटारी, फुटलेली कवले, खराब खिडक्या-दरवाजे; पोलीस वसाहतीची अवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:04+5:302021-06-10T04:16:04+5:30
कोरोनाच्या काळात प्रचंड काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांकडे कोणीही लक्ष देत नाही. पाेलीस वसाहतीमध्ये काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. जप्त केलेली ...
कोरोनाच्या काळात प्रचंड काम करणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांकडे कोणीही लक्ष देत नाही. पाेलीस वसाहतीमध्ये काटेरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. जप्त केलेली वाहने त्याठिकाणी लावल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनातील इतर विभागांतील कर्मचारी कोरोनाकाळात शासनाचे वेतन घरी बसून घेत असताना २४ तास काम करणाऱ्या पोलिसांची ही अवस्था होत असेल? तर सर्वसामान्य नागरिकांची अवस्था काय असेल? या विषयाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी हलगीनाद आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे दीपक भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे माउली हळणवर, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, न.पा. बांधकाम समितीचे सभापती विक्रम शिरसट, अक्षय बोरकर, सतीश वसेकर, महेश गुंड, नवनाथ कोले, लक्ष्मण चव्हाण, अप्पा गुंड, रोहित गुंड, सचिन कोळेकर, बबन येळे आदी उपस्थित होते.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
कामाला तत्काळ सुरुवात झाली नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात उग्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी माउली हळणवर यांनी दिला. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.व्ही. गुंड यांनी पोलीस वसाहतीतील दुरुस्तीची कामे दोन दिवसांत सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे हलगीनाद आंदोलन मागे घेण्यात आले.
फोटो ::::::::::::::
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमाेर हलगीनाद आंदोलन करताना माउली हळणवार, दीपक भोसले व अन्य कार्यकर्ते.