‘एसबीआय’ची ग्राहक सेवा केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 04:06 AM2018-04-09T04:06:30+5:302018-04-09T04:06:30+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) ग्राहक सेवा केंद्रे १ एप्रिल २०१८ पासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे.

Closing of customer service centers of SBI | ‘एसबीआय’ची ग्राहक सेवा केंद्रे बंद

‘एसबीआय’ची ग्राहक सेवा केंद्रे बंद

googlenewsNext

- संताजी शिंदे 
सोलापूर : स्टेट बँक आॅफ इंडियाची (एसबीआय) ग्राहक सेवा केंद्रे १ एप्रिल २०१८ पासून बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनने दिली आहे. त्यामुळे देशात ४,४५४ वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे.
ग्रामीण भागातील लोकांची नाळ राष्ट्रीयीकृत बँकेशी जोडण्यासाठी २0१0 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात अर्थसंकल्पात बँकिंग सेवा देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी २ हजार लोकसंख्येच्या गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू केले. खाते उघडण्यासाठी वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींची निवड केली होती. प्रतिनिधींना बँकेत खाते उघडणे व अन्य ट्रान्झॅक्शनवर कमिशनच्या स्वरूपात मानधन दिले जात होते.
अटल पेन्शन, जीवनज्योती, सुकन्या योजना, व्यक्तिगत अपघात विमा, शिष्यवृत्ती, सामाजिक अर्थसहाय्य आदी योजनांची माहिती ग्राहकांना मिळत असताना वर्षभरापासून ही सेवा बंद करण्याचा घाट घातला जात होता. त्याविरोधात वैयक्तिक व्यवसाय प्रतिनिधींनी १९ सप्टेंबर व २१ मार्चला मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही.
>३१ मार्चला मुंबईत स्टेट बँक एलएचओ कार्यालयात व्यवसाय प्रतिनिधींच्या करस्पॉडंट वेल्फेअर असोसिएशन सोबत बैठक झाली. त्यात तुमचा करार संपल्याचे सांगण्यात आले. १ एप्रिल २0१८ पासून राज्यातील ४४५ प्रतिनिधींसह देशभरातील सुमारे ४,४५४ हजार तरूणांवर बेरोजगाराची कुºहाड कोसळली, असे करस्पॉन्डट वेल्फेअर असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष राजाराम आवळे यांनी सांगितले.

Web Title: Closing of customer service centers of SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :SBIएसबीआय