सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक

By विलास जळकोटकर | Published: June 5, 2024 06:17 PM2024-06-05T18:17:15+5:302024-06-05T18:18:27+5:30

पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

clothing shop caught fire due to short circuit in solapur | सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक

सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक

विलास जळकोटकर, सोलापूर: शहरातील नवीपेठ सारख्या गजबलेल्या बाजारपेठेतील रेडीमेड कपड्याच्या दुकानास शॉर्टसर्किट होऊ आग लागली. यात ७ ते आठ लाखांचा मालासह सव्वा लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. बुधवारी पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी नवी पेठ मध्ये लकी चौक ते नवी पेठ या दरम्यानच्या रोडवर सुरेशलाल वठवाणी यांचे अमित क्रिएशन हे होजीयरी व ड्रेसचे दुकान आहे. ११:४५ च्या दरम्यान त्यांच्या दुकानातून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दुकानामध्ये सर्व कपडे असल्याने पेटलेल्या आगीत काही वेळातच पेट घेऊन खाक झाले.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान श्रीकांत भडके ,समीर पाटील, किरण कादे हे दाखल झाले त्यांनी आग आटोक्यात आणली. यात ७ ते ८ लाखांचे दुकानातील कपडे आणि सव्वा लाख रुपयांचीरोख रक्कम जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार महावितरण कडे तक्रार करूनही महावितरण ने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या घटनेची फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

 

Web Title: clothing shop caught fire due to short circuit in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग