वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये सोलापुरात ढगफुटी, शहरात झाडे उन्मळून पडले; ठीक ठिकाणी पाण्याचे तळे

By संताजी शिंदे | Published: April 28, 2023 06:02 PM2023-04-28T18:02:11+5:302023-04-28T18:02:36+5:30

सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास आकाशामध्ये काळे ढग जमा झाले. वाऱ्याला सुरुवात झाली त्यानंतर पाऊस सुरू झाला.

Cloud burst in Solapur in lightning storm with strong winds, uprooted trees in the city; Water ponds in good places | वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये सोलापुरात ढगफुटी, शहरात झाडे उन्मळून पडले; ठीक ठिकाणी पाण्याचे तळे

वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये सोलापुरात ढगफुटी, शहरात झाडे उन्मळून पडले; ठीक ठिकाणी पाण्याचे तळे

googlenewsNext

सोलापूर : वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटामध्ये सोलापुरात ढगफुटी झाली. शहरात काही भागांमध्ये झाडे उमावून पडली तर बहुतांश भागांमध्ये रस्त्यावर पाण्याचे तळे झाले. शुक्रवारी दिवसभर कमी अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी ४.२० वाजण्याच्या सुमारास आकाशामध्ये काळे ढग जमा झाले. वाऱ्याला सुरुवात झाली त्यानंतर पाऊस सुरू झाला.

अचानक सुरू झालेल्या पावसाच्या तडाख्यामध्ये, विजेच्या कडकडाटासह वादळ वारे मोठ्या प्रमाणात सुरू झाले. वादळवाडी येथे मोठे होते की शहरातील काही भागांमध्ये रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तुटून पडली. तर काही झाडे उन्मळून पडली. पाहता पाहता पावसाने रौद्ररूप धारण केले. तुम्हा धार पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तब्बल ३५ मिनिटानंतर पाऊस हळूहळू थांबत होता.
 

Web Title: Cloud burst in Solapur in lightning storm with strong winds, uprooted trees in the city; Water ponds in good places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.