सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता

By Appasaheb.patil | Updated: September 20, 2022 12:18 IST2022-09-20T12:18:01+5:302022-09-20T12:18:13+5:30

सकाळपासून सुर्यदर्शन नाही; हवेत वाढला गारवा

Cloudy weather in Solapur since morning; A chance of rain in the afternoon | सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता

सोलापुरात सकाळपासून ढगाळ वातावरण; दुपारनंतर पावसाची शक्यता

सोलापूर : सोलापुर शहर व जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. सुर्यदर्शनही झाले नाही. दुपारनंतर मध्यम ते मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

दरम्यान, मंगळवारी रात्री सोलापूर शहराबाहेर व अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस झाला. यंदाच्या मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस हा अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यात झाला. त्यामुळे शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मंगळवारी रात्रीही अक्कलकोट जोरदार पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मंगळवार सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने हवेत जास्त प्रमाणात गारवा जाणवत आहे. दुपारनंतर पावसाची जोरदार शक्यता वर्तविण्यात आली आहे. आतापर्यंत हवामान विभाागाने वर्तविलेली सर्व अंदाज अचुक 

Web Title: Cloudy weather in Solapur since morning; A chance of rain in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.