कोरोना होईल म्हणून मुख्यमंत्री फाईलवर सही करत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:40 AM2021-02-06T04:40:43+5:302021-02-06T04:40:43+5:30
पंढरपूर विभागीय महावितरणच्या कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या फाटकाला टाळे ठोकले. या दरम्यान राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ...
पंढरपूर विभागीय महावितरणच्या कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या फाटकाला टाळे ठोकले. या दरम्यान राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के, शहराध्यक्ष विक्रम शिरसाट, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, सरचिटणीस बादलसिंह ठाकूर, नगराध्यक्ष साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, दिनकर मोरे, जि. प. सदस्य वसंतनाना देशमुख, सुभाष माने, पंचायत समिती उपसभापती भैया देशमुख, युवानेते प्रणव परिचारक, नगरसेवक अनिल अभंगराव, लक्ष्मण धनवडे, हरिष गायकवाड, अरूण घोलप, दिलीप घाडगे, गंगामामा विभुते, राजू गावडे, बाळासो देशमुख, विवेक कचरे, अगंतराव रणदिवे, दिनकर नाईकनवरे, बाबासाहेब बडवे, नगरसेविका शकुंतला नडगीरे, विवेक परदेशी उपिस्थित हाते.
बंद शाळेला लाखाचे बील
पंढरपुरातील शाळा बंद होती. या बंद शाळेला १ लाख रुपये, तर झोपडपट्टीतील एका घराला ४६ हजार रुपये इतके आवाढव्य बील आकारले आहे. या बिलांची प्रत घेऊन आ. परिचारक आले होते. प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे शाळा बंद असताना, शाळेला एक लाख बिल कसे येऊ शकते ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
फोटो : पंढरपूर विभागीय महावितरणच्या कार्यालयाच्या फाटकाला टाळे ठोकताना आ. प्रशांत परिचारक व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते. (फोटो : सचिन कांबळे)