मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी पंढरपुरात; आषाढी पूर्व तयारीचा घेणार आढावा अन् करणार पाहणी
By Appasaheb.patil | Published: July 13, 2024 05:16 PM2024-07-13T17:16:51+5:302024-07-13T17:17:25+5:30
आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : आषाढीचा मुख्य सोहळा बुधवार १७ जुलै २०२४ रोजी होणार आहे. आषाढीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून १५ लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आषाढी एकादशी पूर्व तयारी याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी पंढरपुरात येणार आहेत.
सकाळी सकाळी ९ वाजता वर्षा निवासस्थान येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण. सकाळी ९.३० वाजता मुंबई विमानतळ येथै आगमन व शासकीय विमानाने बारामती विमानतळ, पुणेकडे प्रयाण. सकाळी १० वाजता बारामती विमानतळ, पुणे येथे आगमन व मोटारीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर, श्री क्षेत्र पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण. दुपारी १२ वाजता आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी व पाहणी दौरा. दुपारी ३ वाजता मोटारीने बारामती विमानतळ, पुणेकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता बारामती विमानतळ, पुणे येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण. सायंकाळी ५.३० वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने वर्षा निवासस्थानाकडे प्रयाण. सायंकाळी ६ वाजता वर्षा निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे आगमन व राखीव असा दौरा असणार आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती तयारी व आढावा घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलिस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांच्यासह मंदिर समितीच्यावतीने योग्य ते नियोजन, तयारी करण्यात आली आहे.