सीएमआय ॲपमुळे गुन्हेगाराची माहिती घेणे सहज शक्य; विशेष पोलिस महानिरीक्षकांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:50 PM2021-12-17T17:50:14+5:302021-12-17T17:53:16+5:30
विशेष पोलीस महानिरीक्षक : परिक्षेत्राच्या पाच जिल्ह्यातील पोलिसांना दिसणार माहिती
सोलापूर : नाईट राऊंडच्या गस्तीमध्ये पोलिसांना जर संशयीत इसम मिळून आला तर सीएमआय (क्रिमीनल मॉनेटरींग इंटेलिजन्स) या ॲपच्या माध्यमातून त्याची माहिती मिळवणे सहज शहक्य होणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यातील पोलिसांच्या मोबाईलमध्ये हे ॲप असणार असून, यामुळे वॉन्टेड गुन्हेगार सापडण्यास मदत होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी सोलापुरच्या दौऱ्यावर अले असता ते पत्रकारांशी बोलत होते. परिक्षेत्रात रात्रीच्या गस्तीसाठी निघालेल्या पोलिसांकडे सर्व आरोपींची यादी सोबत ठेवणे शक्य नसते. गस्त घालत असताना एखादा संशयीत इसम आढळून आल्यानंतर त्याची माहिती घेण्यासाठी ॲपवर नाव टाकले की त्याचे रेकॉर्ड मिळणार आहे. संशयीत इसम जर रेकॉर्डवरील गुन्हेगार असेल अन तो जर कोल्हापुरातील किंवा पुणे ग्रामीण भागातील असेल तर तेथे त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल आहे हे समजणार आहे. परिक्षेत्रातील गुन्हेगार पाच जिल्ह्यात कोठेही सहज निष्पन्न होणार आहे. संशयीताला पोलीस ठाण्यात नेऊन त्याचे रेकॉर्ड तपासण्याची गरज नाही. पाहिजे असलेले गुन्हेगार शोधण्यास मदत होणार आहे. ॲपची माहिती कन्ट्रोल रूमशी संलग्नीत असणार आहे.
२०२० मध्ये कोरोना असल्यामुळे गुन्हेगारी कमी होती, त्यामुळे २०१९ च्या तुलनेत २०२१ या वर्षात २० टक्क्याने गुन्ह्यात वाढ झाली आहे. प्रॉपर्टी गुन्हे, प्रॉपर्टी रिकव्हरी व अन्य गुन्ह्यात वाढ झाली आहे. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात गुन्हे वाढ होणे सहाजीक आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ग्रामसुरक्षा दला अंतर्गत प्रत्येक गावात सदस्य नेमण्यात आले आहेत. सर्वांचे मोबाईलवर रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. ग्रामीण भागात या सदस्यांकडून पोलिसांना तत्काळ माहिती व मदत मिळणार आहे असेही महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी सांगितले.
दंड वाढल्यामुळे शिस्त लावण्यात मदत होईल
- ० रस्ते चांगले झाल्यामुळे वाहनांचा वेग वाढत आहेत. अपघात वाढत आहेत, मात्र रस्त्यांवरील इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करून वाहनांवर कारवाई करणार आहोत. शसानाकडून वाढीव दंड आला आहे त्याचा ही फायदा आम्हाला होणार आहे असेही यावहेळी मनोज लोहिया यावेळी म्हणाले.