मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:05 AM2017-08-19T05:05:23+5:302017-08-19T05:05:23+5:30

राज्य सरकारने शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर आता विविध मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करावे

CM's positive for debt waiver of backward class corporations - Ramdas Athavale | मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - रामदास आठवले

मागासवर्गीय महामंडळांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सकारात्मक - रामदास आठवले

Next

पंढरपूर : राज्य सरकारने शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतर आता विविध मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी होऊ लागली़ ही कर्जमाफी करण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत, पण ती आत्ताच होऊ शकणार नाही़ असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे सांगितले़
शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, ‘शिवसेना सत्तेतून बाहेर गेली तरी राज्यातील सरकारला सध्या कोणताही धोका नाही़ भाजपाकडे सध्या १३० आमदार आहेत़ सत्तेसाठी १४५ आमदारांची गरज आहे़ देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे़
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपामध्ये प्रवेश करतील़ कारण त्यांना भविष्यात काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची संधी नाही.’

Web Title: CM's positive for debt waiver of backward class corporations - Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.