अपघात झालेल्या शेतकºयाच्या मदतीला धावले सहकारमंत्री सुभाष देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:28 PM2018-04-19T13:28:15+5:302018-04-19T13:28:15+5:30
मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वत: देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकºयांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले.
सोलापूर : होनमुर्गी फाट्याजवळ झालेल्या अपघातातील शेतकरी रस्त्यावर जखमी पडला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले असताना त्यांना भाजी घेऊन जाणाºया शेतकºयांचा अपघात झाल्याचे निदर्शनास येताच क्षणात कसलाही विचार न करता गाडी बाजूला घेतली अपघातग्रस्त शेतकºयांला विव्हळत पडलेला पाहून मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर स्वत:ची गाडी देऊन जखमी शेतकºयांला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले. फोनवर सिव्हिल मध्ये डॉक्टरांशी बोलून उपचार करण्यासाठी स्वत: जातीने लक्ष घातले.
ट्रक्सच्या धडकेने जखमी झालेल्या शेतकºयांला रस्त्याच्या कडेला रक्ताने लटपटत पडलेला पाहून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी तत्परता दाखवून त्याला मदतीचा हात दिला. मंत्री असल्याचा किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल हि भावना मनात न आणता स्वत: देशमुखांनी सहकार्य केल्याबद्दल आजूबाजूला जमलेल्या गावकºयांनी सुभाष देशमुख यांचे आभार मानले.
----------
मागील दोन दिवसांपूर्वी सोलापूर-तुळजापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सोलापूरचे दोन प्राध्यापकांच्या गाडीला अपघात झाला़ अपघातानंतर बघ्यांची गर्दी जमली़ जखमींना तातडीने उपचारासाठी हलविणे गरजेचे होते़ मात्र कोणीही पुढे धजावत नव्हते़ ही परिस्थिती बराच वेळ होती़ त्यामुळे दोन प्राध्यापकांना उपचार न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला़ अपघातानंतर कोणीही पुढे होऊन तत्परता दाखविली पाहिजे याचा आदर्श सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी घालून दिला़ सहकारमंत्री सुभाष देशमुख तत्परता याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे़