५९ ग्रामपंचायतींसह सहकारी संस्थांकडे एक कोटींची पाणीपट्टी थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:23 AM2021-03-10T04:23:25+5:302021-03-10T04:23:25+5:30

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने तालुक्यातील मेथवडे-माळीवस्ती, मांजरी, हलदहिवडी, महुद बु, देवळे ५ गावांना त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू आहे. ...

Co-operative societies including 59 gram panchayats are in arrears of Rs | ५९ ग्रामपंचायतींसह सहकारी संस्थांकडे एक कोटींची पाणीपट्टी थकबाकी

५९ ग्रामपंचायतींसह सहकारी संस्थांकडे एक कोटींची पाणीपट्टी थकबाकी

Next

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने तालुक्यातील मेथवडे-माळीवस्ती, मांजरी, हलदहिवडी, महुद बु, देवळे ५ गावांना त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू आहे. ऐन उन्हाळ्यातदेखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. दुष्काळी सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे.

शिरभावी पाणीपुरवठा योजनेची शिरभावी २ लाख ८६ हजार ४९७, संगेवाडी २ लाख ७० हजार ८८१, मेथवडे ६ लाख २७ हजार ८०१,

मेथवडे-माळीवस्ती १ लाख ४२ हजार ८८५, मांजरी २ लाख ३१ हजार ६२३, बामणी १ लाख १८ हजार ६३४, चिंचोली १ लाख ५७ हजार ६१३, वाकी-शिवणे १ लाख ५३ हजार ६२३, महूद ७ लाख ३० हजार ९७१, महिम १ लाख ३६ हजार १६९, खवासपूर २ लाख ४३ हजार ९१५, लोटेवाडी १ लाख ९६ हजार २५४, अचकदाणी १ लाख ४२ हजार ८५७, लक्ष्मीनगर ३ लाख २६ हजार ८२१, नरळेवस्ती २ लाख ९३ हजार १६५, आलेगांव १ लाख ६ हजार ८७०, वाढेगांव ८ लाख ४५ हजार ६२४, सोनंद ८४ हजार ५४५, आगलावेवाडी १ लाख ६२ हजार ९५, जवळा १ लाख ४२ हजार ७१२, कारंडेवाडी १ लाख ८५ हजार ७७४, भोपसेवाडी १ लाख ७२ हजार ७८८, वझरे २ लाख ४३ हजार २४७, बलवडी १ लाख ९ हजार ३७, अजनाळे १ लाख ८८ हजार ७८२, अकोला १ लाख ९२ हजार ८६५, कोळा ३ लाख ६३ हजार ६४९, सोमेवाडी ८२ हजार ८२१, राजापूर ९६ हजार ७११, हबीसेवाडी १ लाख १४ हजार ४५३, हंगिरगे ८९ हजार ९८२, जुजारपूर २ लाख १६ हजार ६२१ यासह ५९ गावांकडे मिळून सुमारे ८२ लाख ७८ हजार २३३ रुपयांची थकबाकी आहे. शेतकरी सूत गिरणीकडे ७ लाख ८७ हजार ३२२, मंगळवेढा पंचायत समितीकडे ४ लाख २१ हजार २७६, पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २००, सांगोला तहसील कार्यालय १ लाख २६ हजार १९, सांगोला नगरपालिका ३ लाख २९ हजार ३९९ अशी एकूण शिरभावी पाणीपुरवठा योजनेची ९९ लाख ८५ हजार ४४८ रुपये पाणीपट्टीची बिले येणे बाकी आहे.

शासकीय कार्यालयाकडेही थकबाकी येणे

२०१८ च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला

टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून मंगळवेढा पंचायत समितीकडे ४ लाख २१ हजार २७६ रुपये व पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २०० रुपये थकबाकी असून सांगोला तहसिल कार्यालयाकडे १ लाख २६ हजार १९ इतकी थकबाकी आहे.

Web Title: Co-operative societies including 59 gram panchayats are in arrears of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.