आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यातून करमाळयात सहशिक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:14 PM2021-07-22T16:14:32+5:302021-07-22T16:15:36+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Co-teacher commits suicide in Karmala due to financial fraud | आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यातून करमाळयात सहशिक्षकाची आत्महत्या

आर्थिक फसवणूक झाल्याने नैराश्यातून करमाळयात सहशिक्षकाची आत्महत्या

Next

करमाळा : गुळसडी (ता.करमाळा) येथील विठामाई खंडागळे  माध्यमिक वियालयाचे सहशिक्षक बळीराम गोविंद वारे (वय ४६) यांनी आज (ता.२२) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील गणेशनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

वारे हे गुळसडी येथील खंडागळे विद्यालयात सन २००२ पासून कला व मराठीचे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची आर्थिक फसवणूक झाली असून त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.

वारे यांचे मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते करमाळा शहरातील गणेशनगर मध्ये राहात होते. त्यांचे मूळगाव रत्नापूर (ता.जामखेड) हे असून हिवरे (ता.करमाळा) ही त्यांची सासुरवाडी आहे. या प्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली असून आत्महत्येचे नेमके कारण काय हे पोलीस तपासात समजणार आहे.

Web Title: Co-teacher commits suicide in Karmala due to financial fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.