वडिलांच्या अस्थी शेतात पुरून लावले नारळाचे रोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:52+5:302021-03-28T04:21:52+5:30
घरातील वडीलऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी राख सावडण्याची परंपरा आहे. त्यानंतर अस्थी विसर्जन पंढरपूर येथे भीमा नदीत किंवा ...
घरातील वडीलऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी राख सावडण्याची परंपरा आहे. त्यानंतर अस्थी विसर्जन पंढरपूर येथे भीमा नदीत किंवा निरा नदीत सोडल्या जातात. यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण होत असले तरी रूढी-परंपरा जपल्या जात आहेत. मात्र जुन्या परंपरा बदलल्या पाहिजेत या विचाराचे तरुण पुढे येत आहेत.
बीबीदारफळ येथील रहिवासी व
मराठा सेवा संघाचे उत्तर तालुकाध्यक्ष शैलेश साठे यांचे वडील बाजीराव साठे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनानंतर तिसरा दिवस करताना अस्थी स्वतःच्या शेतात खड्डा खोदून त्यात टाकल्या व त्यावर नारळाचे रोपटे लावण्यात आले.
भूतबाधा अशा अनेक प्रकारे भीती घातली जात असली तरी ज्या शेतात वडील राबले, कष्ट उपसले त्यांची आठवण नारळाला पाणी घालताना येईल, असे शैलेश साठे यांचे मत आहे.
---