लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १५ मार्च दरम्यान शक्य: श्रीकांत देशपांडे  

By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 29, 2024 08:00 PM2024-02-29T20:00:04+5:302024-02-29T20:00:25+5:30

राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी माहिती दिली.

Code of conduct for Lok Sabha elections possible between March 15 says Srikant Deshpande | लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १५ मार्च दरम्यान शक्य: श्रीकांत देशपांडे  

लोकसभा निवडणुकीची आचार संहिता १५ मार्च दरम्यान शक्य: श्रीकांत देशपांडे  

सोलापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून १५ मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली आहे.

श्रीकांत देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. निवडणूक तयारीचा आढावा त्यांनी घेतला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता संबंधित तक्रार करावयाचे असल्यास संबंधितांनी निवडणूक विभागाच्या ॲपवर तक्रार नोंदवू शकतात. संबंधित प्रकरणातील फोटो तसेच व्हिडिओ अपलोड करून माहिती देऊ शकता. तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती दिली जाते. तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या शंभर मिनिटात अधिकारी स्पॉटवर पोहोचतील. कारवाईची प्रक्रिया सुरू करतील. तक्रारदारांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

Web Title: Code of conduct for Lok Sabha elections possible between March 15 says Srikant Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.