सोलापूर जिल्ह्यात २७ गावात २१७ घरांची पडझड - जिल्हाधिकारी
By admin | Published: October 3, 2016 09:59 PM2016-10-03T21:59:23+5:302016-10-03T21:59:23+5:30
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २७ गावात २१७ घरांची पडझड झाली आहे. ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले त्या ठिकाणचे पंचनामे करून तातडीने
Next
dir="ltr">
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 3- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २७ गावात २१७ घरांची पडझड झाली आहे. ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले त्या ठिकाणचे पंचनामे करून तातडीने मदत करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली़.
सीना कोळेगाव धरण (परांडा-उस्मानाबाद) क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे हे तीन टीएमसी क्षमतेचे धरण भरले आहे़ त्यामुळे ९० टक्के पाणी ठेवून उर्वरित पाणी सीना नदीत सोडले जात आहे़ रविवारी तब्बल ६५ हजार क्युसेक्स वेगाने सीना नदीत सोडले आहे़ त्यामुळे रविवारी सीना नदीला पुराचे स्वरूप आले होते़ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता़ सोमवारपासून हे पाणी कमी झाले आहे़ या पुराच्या पाण्यामुळे जास्त कोणाचे नुकसान झाले नाही़ बार्शी, वैराग तसेच तुळजापूर आदी भागात जास्त पाऊस पडल्यामुळे अनेक रस्ते बंद झाले होते़ काही पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली़. उजनी धरण १०० टक्के क्षमतेने भरले आहे़ मात्र पाण्याचे नियोजन काय असे विचारता जिल्हाधिकारी म्हणाले की, उजनीच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन केले जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले़
प्रशासन सतर्क
सीना नदीवरील पूरपरिस्थिती तसेच जिल्ह्यात पडणाºया मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांची जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या़ पाऊस वाढलाच तर राज्यपातळीवरील पथक देखील बोलावण्याबाबत आम्ही तयारीत आहोत, असे जिल्हाधिकारी म्हणाले़ नुकसान झालेल्या घरांचे, पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत़