सोलापूर जिल्ह्यातील १ हजार १७७ शस्त्रधारकांना शस्त्रे जमा करा; जिल्हाधिकाºयांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:23 AM2019-03-16T11:23:34+5:302019-03-16T11:25:09+5:30
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार १७७ शस्त्रधारकांना पोलिसांकडे शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.शासकीय इमारती, ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १ हजार १७७ शस्त्रधारकांना पोलिसांकडे शस्त्रे जमा करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.शासकीय इमारती, खासगी मालमत्ता आदी ठिकाणी आचारसंहिता भंग करणाºया फ्लेक्स, झेंडे व जाहिराती असे एकूण १६ हजार २११ प्रकारचे प्रचार साहित्य हटविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासांत शासकीय जागेतील फ्लेक्स व अन्य प्रकारचे प्रचार साहित्य हटविण्याची मोहीम घेण्यात आली होती. त्यानंतर ४८ तासांत खासगी मालकीच्या ठिकाणी दिसून येणारे फ्लेक्स काढण्याची मोहीम सोमवारपासून हाती घेण्यात आली. यात ६ हजार ९२ ठिकाणांचे प्रचार साहित्य हटविण्यात आले. खासगी जागेवर असणारे ९ हजार १३१ फ्लेक्स व अन्य साहित्य हटविण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण ४ हजार ४९३ शस्त्रपरवानाधारक आहेत. यात स्वरक्षणासाठी अत्यंत गरज असेल, अशा व्यक्तींना शस्त्र कायम ठेवण्याचा निर्णय शस्त्रपरवाना नियंत्रण कमिटीने घेतला आहे. यात उद्योजक, ज्वेलरीधारक, अतिमहत्वाच्या व्यक्ती यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर सोमवारी राजकीय लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन त्यांना आचारसंहिता भंग करणाºया फ्लेक्स, झेंडे व अन्य प्रकारचे साहित्य काढण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकाºयांच्या या आदेशानुसार राजकीय पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी उभारलेले फ्लेक्स काढून घेतले आहे.
खासगी ठिकाणी अजूनही फ्लेक्स असल्याचे निदर्शनास आल्यास याविरुध्द संबंधितांवर आचारसंहिता भंग झाल्याची कारवाई करण्यात येईल. मालमत्ता विद्रुपीकरण नियमानुसार याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी सांगितले.