ब्रेक द चेन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:24+5:302021-05-15T04:20:24+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील करोळे आणि उंबरे येथे ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करकंब पोलीस स्टेशन हद्दीतील करोळे आणि उंबरे येथे ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करीत असताना पाटील यांनी वरील आवाहन केले. शासनाने घालून दिलेले नियम मोडून गावात विनाकारण फिरणाऱ्या वर कारवाई करणार आहे. शिवाय अवैध मार्गाने चालत असलेले धंदे निदर्शनास आले तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.
तसेच अनावश्यकपणे आस्थापना सुरू ठेवून किंवा चोरून साहित्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्या त्या गावात नेमणुकीस असलेल्या पोलिसांना दिल्या. लसीकरण टोकन देण्यावरून गावांमध्ये वाद निर्माण होऊ नये याकरिता टोकन पद्धती पारदर्शक राबविण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या.
यावेळी पाटील यांनी स्थानिक ग्रामस्तरीय कोरोना समितीला बरोबर घेऊन गावामध्ये होम आयसोलेशनमध्ये असणारे कोरोना बाधित रुग्ण व त्यांचे कुटुंबाच्या भेटी घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी प्रशांत पाटील यांनी दिल्या.
---
१२ करकंब
ग्रामस्तरीय कोरोनाविषयक बैठकीत सूचना करताना सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील