जिल्हाधिकारी दीड तास दर्शनबारीत

By Admin | Published: October 15, 2016 03:48 AM2016-10-15T03:48:33+5:302016-10-15T03:48:33+5:30

सोलापूरचे जिल्हाधिकारीरणजित कुमार वारकऱ्यांप्रमाणे मुलाला खांद्यावर घेऊन दर्शनबारीत उभे राहिले. सुमारे दीड तासानंतर त्यांनी विठोबा-रुक्मिीणीचे दर्शन

Collector meets one and a half hour | जिल्हाधिकारी दीड तास दर्शनबारीत

जिल्हाधिकारी दीड तास दर्शनबारीत

googlenewsNext

प्रभू पुजारी / पंढरपूर
सोलापूरचे जिल्हाधिकारीरणजित कुमार वारकऱ्यांप्रमाणे मुलाला खांद्यावर घेऊन दर्शनबारीत उभे राहिले. सुमारे दीड तासानंतर त्यांनी विठोबा-रुक्मिीणीचे दर्शन घेतले.
जिल्हाधिकारी दर्शनाला येणार असल्याची चर्चा अशी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये सकाळपासून चर्चा होती़ परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी व्हीआयपी लवाजमा सोडून देऊन दर्शनमंडपातून वारकऱ्यांशी संवाद साधत रांगेतून सहकुटुंब दर्शन घेतले़. त्यांचे दर्शन झाल्यानंतर जिल्हाधिकारी आल्याचे कळाले आणि सर्व कर्मचाऱ्यांची एकच धावाधाव झाली़ दर्शनानंतर त्यांचा मंदिर समितीने सत्कार केला आणि नवरात्रोत्सवाची सांगता असल्याने तयार केलेला काला (ज्वारीच्या लाह्या, दही, सफरचंद, डाळींब, पेरू व मसाला आदींचे मिश्रण) प्रसाद म्हणून देण्यात आला़
आम्ही नेहमी थेट दर्शन घेतोच, पण आज विशेषच! कारण माझ्यासोबत आई, वडील, बहीण, पत्नी आणि मुलगा आहे़ म्हणून आज रांगेतून दर्शन घेण्याचा योग आला़ रांगेतून आल्यामुळे वारकऱ्यांच्या भावना अनुभवता आल्या़ त्यांच्यासाठी आणखी काय सोयी-सुविधांची गरज आहे हे कळाले़, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Collector meets one and a half hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.