बार्शीत विवाहसोहळ्यात क्षमतेपेक्षा जास्त लोक जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:01+5:302021-07-27T04:24:01+5:30
राऊतांच्या................................. विवाहाला क्षमतेपेक्षा गर्दी बार्शीत संयोजकावर गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क बार्शी : लातूर रोडवर लक्ष्मी कृषी उत्पन्न बाजार ...
राऊतांच्या................................. विवाहाला क्षमतेपेक्षा गर्दी
बार्शीत संयोजकावर गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : लातूर रोडवर लक्ष्मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला क्षमतेपेक्षा जास्त लोकांना जमवून विवाह लावल्याप्रकरणी बार्शी पोलिसात आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवरदेव रणजित व रणवीर हे दोघेही आमदार राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र आहेत.
याबाबत पोलीस अमोल संतराम वाडकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून आयोजक योगेश मारुती पवार (रा. संभाजीनगऱ आरणगाव रोड) यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे .
हा विवाह सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रणजित राऊत व त्याचे बंधू रणवीर यांचा २६ रोजी विवाह सोहळ्यासाठी आयोजकांनी २३ रोजी पोलिसात विवाह सोहळ्याची परवानगी मगितली होती. त्यावर त्यास नाहरकत पत्राद्वारे ५० लोकांची क्षमता देऊन उपस्थितांना मास्क लावण्याचे व सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत लेखी कळविले होते. परंतु विवाहाच्या वेळी काही पोलिसांना पाठविण्यात आले असता दिलेल्या फिर्यादीत तीन हजाराच्या आसपास क्षमतेपेक्षा जास्त तर मास्क न लावलेले दिसल्याने आयोजकांवर हा गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अजित वरपे करत आहेत.