क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून

By विलास जळकोटकर | Published: July 17, 2023 07:05 PM2023-07-17T19:05:17+5:302023-07-17T19:05:26+5:30

सोलापूर : क्लास चालू असताना मैत्रिणीला बाहेर बोलावून, तिचा मोबाईलवरील तिच्या नातलगाचे चॅटिंग बघून गालावर सनकावून चापट मारण्याची धक्कादायक ...

college going boy slapped girl outside of class, incident in solapur | क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून

क्लासच्या बाहेर बोलावून कॉलेजकुमारानं दिली मैत्रिणीच्या गालावर सनकावून

googlenewsNext

सोलापूर : क्लास चालू असताना मैत्रिणीला बाहेर बोलावून, तिचा मोबाईलवरील तिच्या नातलगाचे चॅटिंग बघून गालावर सनकावून चापट मारण्याची धक्कादायक घटना एका महाविद्यालयात शनिवारी दुपारी १:१५ च्या दरम्यान घडली. या प्रकरणी त्या कॉलेजकुमाराविरुद्ध पिडित तरुणीच्या तक्रारीनुसार जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

पिडित काॅलेजकुमारीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ती स्वत: शहरातल्या एका महाविद्यालयात इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. तिची व तृतीय वर्षाला शिकणाऱ्या मोहसीन नदाफ याची ओळख झाली होती. त्यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला होता. यानंतर तो नेहमी व्हॉटस्अपवर मेसेज पाठवून संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायचा. शनिवारी १५ जुलै रोजी दुपारी पिडित कॉलेजकुमारी क्लास मध्ये असताना यातील संशयित आरोपी वर्गात जाऊन त्याने प्राध्यापकाला संबंधित पिडिता मित्राची बहीण आहे तिला घरी घेऊन जाण्यासाठी आलो म्हणून तिला वर्गाबाहेर बोलावले.

यानंतर तिचा मोबाईल हिसकावून घेऊन पिडितेने तिच्या नातलगाच्या मुलाला इंस्टावर चॅट केलेले मेसेस दाखवून हा कोण आहे असे विचारले. पिडितेने खरे काय ते सांगितले. यावर मोहसीनने अश्लिल शिवीगाळ करुन तिचा मोबाईल फेकून दिला आणि तिला चापट मारली. या प्रकाराबद्दल पिडित कॉलेजकुमारीने जोडभावी पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्याने मोहसीन नदाफ याच्याविरुद्ध विनयभंग, व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा नोंदला आहे. तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड करीत आहेत.

Web Title: college going boy slapped girl outside of class, incident in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.