अरणमध्ये रंगल्या धनुर्विद्याच्या स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:23+5:302021-09-13T04:21:23+5:30
अरण : राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबाद येथे मोडनिंब सिनियर गटाच्या जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी स्पर्धा पार पडली. इंडियन राऊंड, रिकर्व्ह ...
अरण : राज्यस्तरीय स्पर्धा औरंगाबाद येथे
मोडनिंब
सिनियर गटाच्या जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी स्पर्धा पार पडली. इंडियन राऊंड, रिकर्व्ह राऊंड व कंपाउंड राऊंड प्रकारच्या स्पर्धा संत सावता माळी विद्यालय अरण येथे संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उद्घाटन तहसीलदार डॉ. दत्तात्रय मोहाळे यांच्या हस्ते झाले.
जिल्हा परिषदचे सदस्य भारत शिंदे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे व सोलापूर धनुर्विद्या संघटनेचे सचिव हरिदास रणदिवे, पी.एस.आय अनुराधा पाटील, उत्तमराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी राज्य धनुर्विद्या संघटनेचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील प्रशिक्षक व खेळाडूंच्या वतीने हरिदास रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील ६० धनुर्धर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले. स्पर्धेत संत सावता महाविद्यालयाने भरघोस यश मिळविले आहे. सिनियर इंडियन प्रकारात उमाकांत भोसले प्रथम, दिगंबर चव्हाण द्वितीय, आकाश ताकतोडे तृतीय, पायल गाजरे प्रथम, समृद्धी पवार द्वितीय, अर्पिता सावंत तृतीय.
सिनियर रिकर्व्ह प्रकारात,
शिवम चिखले प्रथम, आदित्य भंडारे द्वितीय, रणजित वसेकर तुतीय, श्रेया परदेशी प्रथम, सृष्टी शेंडगे द्वितीय, प्रगती शिंदे.
कंपाउंड राउंडमध्ये सुधाकर पळसे प्रथम, भांगे प्रसाद द्वितीय, निखिल वसेकर तृतीय, तनिष्का ठोकळ प्रथम, स्मृती विरपे द्वितीय, गौरी डवरी तृतीय क्रमांक पटकाविला.
सिनियर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा औरंगाबाद येथे दिनांक १६, १७ व १८ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहेत.