पेनूरमध्ये मुरब्बी अन्‌ तरुणाईंचा रंगतोय सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:56 AM2021-01-13T04:56:13+5:302021-01-13T04:56:13+5:30

मोहोळ : मोहोळपासून १५ किलोमीटरवर असलेलं पेनूर गाव.. इथल्या पुढाऱ्यांचा तालुक्यात बोलबोला.. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली अन्‌ प्रचाराचा एकच धुराळा ...

A colorful match between Murabbi and the youth in Penur | पेनूरमध्ये मुरब्बी अन्‌ तरुणाईंचा रंगतोय सामना

पेनूरमध्ये मुरब्बी अन्‌ तरुणाईंचा रंगतोय सामना

Next

मोहोळ : मोहोळपासून १५ किलोमीटरवर असलेलं पेनूर गाव.. इथल्या पुढाऱ्यांचा तालुक्यात बोलबोला.. ग्रामपंचायतीची निवडणूक लागली अन्‌ प्रचाराचा एकच धुराळा उडालाय. गावची ज्येष्ठ मंडळी एकीकडं अन्‌ सर्वपक्षीय तरुणाई एकीकडं, असं चित्र प्रचारात दिसू लागलंय. हे झालं पुढाऱ्यांचं. सामान्य शेतकरी मात्र अतिवृष्टीत जमीनदोस्त झालेल्या बागा उभारण्यात अन्‌ तुऱ्याला आलेला ऊस कुठल्या कारखान्याला घालवायचा या धडपडीत व्यस्त आहे.

पेनूर ग्रामपंचायतीची स्थापना १९५२ साली झाली. तालुक्याच्या नकाशातील सर्वच राजकीय पक्षांची मोठी पदे भूषवणारे म्हणून हे गाव परिचित. सर्वधर्मियांचं इथं वास्तव्य. परंतु, चवरे व माने या आडनावाचीच मंडळी बहुसंख्य. पेनूर गावचं नाव राज्याच्या राजकारणात पोहोचविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणपतराव देशमुख याच गावचे. पेनूरकरांना निवडणूक नवीन नाही. परंतु, यंदाची निवडणूक जिल्ह्यासह तालुक्याचे लक्ष वेधून घेतलीय.

पंचायत समितीचे माजी उपसभापती मानाजीराव माने, बागायतदार पोपटराव देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य सर्जेराव चवरे, भीमाचे माजी तज्ज्ञ संचालक प्रकाश कस्तुरे, अनिल गवळी, दत्ता सावंत ही जुनी मंडळी ग्रामविकास पॅनलची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचेे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष रमेश माने, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे, सागर चवरे, मारुती गवळी, रामदास चवरे, रणजित चवरे अशा सर्वपक्षीय युवकांनी मिळून रयत परिवर्तन ग्रामविकास पॅनल तयार केला आहे. चुरशीच्या निवडणुकीत युवा नेते दिग्विजय धनाजी माने विरूद्ध माजी उपसरपंच रामदास चवरे यांच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. अन्य प्रभागांत गिरीष गवळी, चरण चवरे, वर्षाराणी सलगर, मयूरी चवरे, रामदास चवरे, दिग्विजय माने यांच्या लढतीही चुरशीच्या होणार आहेत.

पेनूर ग्रामपंचायत

लोकसंख्या : ८,२२५

मतदार: ६,७००

प्रभाग - सहा

निवडून द्यायचे सदस्य - १७ रिंगणात ३६

-----

असे आहेत प्रचारातील मुद्दे

- युवा आघाडीच्या वतीने विकास आराखडा तयार करून विकासाची कामे मार्गी लावू. दरवर्षाचा माहे एप्रिल ते मार्चचा होणारा खर्च गावांमध्ये फळ्यावर लिहून सोशल मीडियावर टाकून पारदर्शक कारभार केला जाणार आहे. यासह गावातून कॅनल गेला असला तरीही शुद्ध पाणी गावाला मिळत नाही. सत्ता आल्यास पाणी देऊ. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची सोय गावातच करण्यात येईल. गावातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्यात येतील असे मुद्दे प्रचारात वापरले जात आहेत.

-जुन्या ज्येष्ठांनी पेनूर गावासाठी नवीन अद्ययावत मानसी ५५ लिटर शुद्ध पाणीपुरवठा करणारी मंजूर योजना कार्यान्वित करणार, प्रत्येक घटकाला घरकुल देण्याचा प्रयत्न असणार, गावातील सर्व गटारी, अंडर ग्राऊंड, सर्व रस्ते, पेवर ब्लॉक, डिजिटल ग्रामपंचायत अशा योजना राबवून गाव सुजलाम्‌ सुफलाम् करण्याचा दावा प्रचारात केला जात आहे.

Web Title: A colorful match between Murabbi and the youth in Penur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.