ऊसाच्या क्षेत्रात रंगली रब्बीपीक स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:14 AM2021-07-23T04:14:48+5:302021-07-23T04:14:48+5:30
अक्कलकोट : तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता रब्बी हंगाम २०२० मध्ये पीक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत बहुतांश शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. ...
अक्कलकोट : तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता रब्बी हंगाम २०२० मध्ये पीक स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत बहुतांश शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा या पिकांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
तालुक्यातील हरभरा पीक स्पर्धेत संजय भोसले, रा. सांगवी प्रथम, शशांक शिरीष कणेकर (रा. किणी) द्वितीय आणि मल्लेशप्पा गुरप्पा गोरे (रा. अक्कलकोट) तृतीय क्रमांक पटकावत तालुक्यातील रब्बी पीक स्पर्धेत यश संपादन केले आहे.
तसेच रब्बी ज्वारी पिकामध्ये संजय धायगुडे (रा. बादोला) प्रथम, धुळप्पा मुळजे (रा. गोगाव), द्वितीय आणि सुशांत किवडे (रा. घोळसगाव) तृतीय क्रमांक पटकावला. या पीक स्पर्धेतील विशेष कामगिरीबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी कवडे यांच्या हस्ते पीक स्पर्धेतील विक्रमी उत्पादन घेणाऱ्या विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी पीक स्पर्धेत यशस्वी शेतकऱ्यांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली.
यावेळी संजय कुमार भोसले यांनी हरभरा पिकाचे बियाणे निवड, संतुलित खते, कृषी सहायक कांबळे यांनी अन्नद्रव्य आणि एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.
---
फोटो : २२ फार्मर
पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविताना उपविभागीय कृषी अधिकारी कवडे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर.