या चिमण्यांनो परत फिरा रे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:22 AM2021-04-24T04:22:43+5:302021-04-24T04:22:43+5:30

काहीतरी वेगळे करावे या विचारातून चिमण्यांना चारा, पाणी ठेवण्याबरोबच त्यांना घरे बनवण्याचा विचार माझ्या मुलांमध्ये आला आणी त्यांनी टाकाऊपासून ...

Come back, these sparrows! | या चिमण्यांनो परत फिरा रे!

या चिमण्यांनो परत फिरा रे!

Next

काहीतरी वेगळे करावे या विचारातून चिमण्यांना चारा, पाणी ठेवण्याबरोबच त्यांना घरे बनवण्याचा विचार माझ्या मुलांमध्ये आला आणी त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ या उक्तीप्रमाणे ओल्या नारळाच्या टाकून दिलेल्या करवंट्यापासून घरटी बनवली व ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या शाळेतील धड्याचा प्रत्यक्ष उपयोग केला, असे पालक सागर भडोळे यांनी सांगितले.

सध्या माणूस माणसापासून दूर जात असताना या पक्ष्यांचाही आपण विचार केला पाहिजे. घरासमोरील चिमण्यांचा चिवचिवाट मुलांना वेगळाच आनंद देतो. आपण या मुक्या पक्ष्यांचाही विचार केला पाहिजे असा संदेश या मुलांनी मोठ्या माणसांना दिला आहे. चिमण्यांना घरट्यासोबतच धान्य व पाणी याचीही सोय या मुलांनी केली आहे. यासाठी या मुलांना शिक्षक पालक सागर भडोळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

----

Web Title: Come back, these sparrows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.