ओबीसींच्या हक्कांसाठी एकत्र या: म्हेत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:27 AM2021-08-25T04:27:34+5:302021-08-25T04:27:34+5:30
अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात सोमवारी ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी म्हेत्रे यांनी केंद्र सरकारच्या ...
अक्कलकोट येथील काँग्रेस कार्यालयात सोमवारी ओबीसी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी म्हेत्रे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव, दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, पंचायत समितीचे सभापती आनंदराव सोनकांबळे, ओबीसी संघर्ष समितीचे नेते शरद कोळी, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, शहराध्यक्ष भारत जाधव ,प्रा. भोजराज पवार, संदीप राठोड, पवन गायकवाड, शेखर बंगाळे, मल्हारी बंडगर, विलास गव्हाणे, सुनीता हडलगी, रईस टिनवाला, मंगल पाटील, अब्दुल मकानदार, नीलकंठ मेंथे, नितीन ननवरे, विलास राठोड, काशीनाथ गोळळे, काशीनाथ कुंभार, शशिकांत कळसगोंडा, डॉ. उदय म्हेत्रे, धर्मराज गुंजले, रमेश चव्हाण, सरफराज शेख, शबाना शेख, विश्वनाथ हडलगी आदी उपस्थित होते.
----
फोटो : २४ चपळगाव १
ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे.
240821\img-20210824-wa0050.jpg
ओबीसींच्या हक्कासाठी मेळाव्यात माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले...