सोलापुरात या कारणामुळे वाढला नाही 'कोरोना'चा प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 10:26 AM2020-04-22T10:26:42+5:302020-04-22T10:35:35+5:30

सोलापूर जिल्हा प्रशासन अलर्ट; या ४८0 जणांची तपासणी; १८ पॉझीटीव्हचा लागला शोध

Comforting; Due to this, the influence of 'Corona' did not increase in Solapur | सोलापुरात या कारणामुळे वाढला नाही 'कोरोना'चा प्रभाव

सोलापुरात या कारणामुळे वाढला नाही 'कोरोना'चा प्रभाव

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्जबाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांची रात्रंदिवस तपासणी सुरूसोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम

सोलापूर: सोलापुरात 'कोरोना' पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ३0 वर गेली असली तरी प्रशासनाने घेतलेल्या या खबरदारीमुळे 'कोरोना'चा आणखी वाढणारा प्रभाव थांबला आहे, असा दावा जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केला.

सोलापुरात पहिल्यांदा १३ एप्रिल रोजी कोरोना पॉझीटीव्हचा रुग्ण आढळला. ज्यावेळी त्या रुग्णाचा अहवाल आला त्यावेळी संबंधीत किराणा दुकानदाराचा मृत्यू झालेला होता. या अहवालानंतर प्रशासनाने तातडीने त्याचा निवासी भाग प्रतिबंधीत करून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला. यात त्यांच्या कुटुंबातील दोन तर त्यांना उपचारासाठी पहिल्यांदा ज्या रुग्णालयात नेले होते, त्या रुग्णालयातील कर्मचाºयांचा शोध घेण्यात आला. यात रुग्णालयातील महिला कर्मचाºयास कोरोणाची लागण झाल्याचे दिसून आल्यावर त्या कर्मचाºयांच्या संबंधातील संपर्काचा शोध घेण्यात आला. यात १६ जण पॉझीटीव्ह आढळले. या भागातील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ४८0 जणांना आणून चाचणी घेण्यात आली. यातूनच संसर्गातून लागण झालेल्या कोरोणा पॉझीटीव्ह रुग्णांचा शोध लागला. या रुग्णांना वेळीच प्रतिबंधीत करण्यात आल्याने या भागातील पुढील संसर्ग टळला आहे. अन्यथा ही संख्या आणखीन वाढली असती असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

आता नव्याने आढळलेल्या बापूजीनगर, शास्त्रीनगर, जगन्नाथनगर, मोदीखाना, मदर इंडिया झोपडपट्टी, रविवार व शनिवारपेठ आणि कुर्बानहुसेननगर झोपडपट्टीतील संसर्गाचा शोध घेण्यात येत आहे.


लोकांनी घरातच बसावे
कोरोनाचा वाढता आलेख टाळण्यासाठी लोकांनी फक्त घरात बसावे. ज्या भागात संसर्ग आढळला आहे, तेथील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा कार्यरत आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांमुळे तयार झालेल्या ९ हॉटस्पॉटमधील प्रत्येक घरांचे सर्वेक्षण करून संसर्ग वाढू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे.

Web Title: Comforting; Due to this, the influence of 'Corona' did not increase in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.