अर्धवट उघडा ठेवलेल्या दरवाजातून येऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:35+5:302021-08-23T04:24:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मंगळवेढा : लक्ष्मी दहिवडी येथे घराचा अर्धवट ठेवलेल्या दरवाज्यातून चोरट्यांनी प्रवेश करून कपाटात डब्यात ठेवलेले सोन्याचे ...

Coming through a door that was left half open | अर्धवट उघडा ठेवलेल्या दरवाजातून येऊन

अर्धवट उघडा ठेवलेल्या दरवाजातून येऊन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मंगळवेढा : लक्ष्मी दहिवडी येथे घराचा अर्धवट ठेवलेल्या दरवाज्यातून चोरट्यांनी प्रवेश करून कपाटात डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सीताराम लक्ष्मण गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. ते शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता जेवण आटोपून कुटुंबासमवेत झोपी गेले होते. थंड हवा आत यावी यासाठी घराचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवला होता. पहाटे दीड वाजता अचानक आवाज आल्याने फिर्यादीची पत्नी नीलाबाई या झोपेतून जागी झाल्या. त्यांना कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. चोरीच्या संशयावरून डब्यातील दागिने व पैशांची तपासणी केली असता ते जागेवर नसल्याचे दिसून आले.

Web Title: Coming through a door that was left half open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.