वरकुटे येथे कालवा दुरुस्ती कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:27 AM2021-09-08T04:27:42+5:302021-09-08T04:27:42+5:30
मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागामध्ये उजनी कॅनॉल बागायत आहे. या परिसरामध्ये कॅनॉलच्या साइड पट्ट्याचा वापर शेतकऱ्यांना मालाची ने-आण करणे, विद्यार्थी ...
मोहोळ तालुक्यातील दक्षिण भागामध्ये उजनी कॅनॉल बागायत आहे. या परिसरामध्ये कॅनॉलच्या साइड पट्ट्याचा वापर शेतकऱ्यांना मालाची ने-आण करणे, विद्यार्थी शाळेत जाणे येणे व अन्य सर्व कामासाठी केला जातो. या कालवा साइडपट्ट्याच्या दुरुस्तीची गरज असून, यासाठी वरकुटे, सौंदणे, आढेगाव आदी भागातील मायनर ५१,५२ व बेगमपूर येथील मायनर चारवरील शेतकऱ्यांनी कालवा दुरुस्ती व सेवा पथ मजबुतीकरणाची मागणी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्याकडे केली होती. त्यानुसार वरील कालव्याचे लाभक्षेत्राच्या यांत्रिकीकरण विभागाने मजबुतीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी भीमा लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता डी. बी. साळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, कार्यकारी अभियंता आर. एन. क्षीरसागर, उपविभागीय अभियंता रोंगे, शाखा अभियंता गरड, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे, पंचायत समितीचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण, सरपंच भारत सूतकर, पेनूरचे उपसरपंच रामदास चवरे, माजी सरपंच काकासाहेब पवार, नागराज पाटील, शिवराज पाटील, विजय कोकाटे, सरपंच पोपटराव जाधव, सूरज आदी शेतकरी उपस्थित होते.
----
वरकुटे येथे कालवा दुरुस्ती व सेवा पथ मजबुतीकरणाच्या कामाचा शुभारंभ करताना झेडपी सदस्य बाळराजे पाटील, अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी.
----