पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:07+5:302021-01-17T04:20:07+5:30
याप्रसंगी तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमनी, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सोलापूर कुष्ठरोग विभाग सहा. संचालक ...
याप्रसंगी तहसीलदार अभिजित सावर्डे-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा दोडमनी, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सोलापूर कुष्ठरोग विभाग सहा. संचालक डॉ. संतोष जोगदंड, क्वालिटी कंट्रोल सोलापूरचे जिल्हा समन्वयक डॉ. उपेंद्र कुशावह, डॉ. प्रभाकर माळी, डॉ. शिवराज भोसले डॉ. आयझर काझी, डॉ. वैभव जांगळे, डॉ. उत्तम फुले, डॉ. एच. व्ही. गावडे, डॉ. महेश राऊत, आरोग्य सेवक अरुण कोळी, निशिकांत पापरकर, पाडुरंग नवले यांच्यासह डॉक्टर, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका उपस्थित होत्या.
प्रत्यक्षात लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पोर्टलवर नोंद केलेल्या पहिल्या लाभार्थ्यांची सर्व माहिती घेतल्यानंतर अचानक त्यांनी लसीकरणास नकार दिला. दुसऱ्याही लाभार्थ्यांचे लसीकरण काही कारणाने झाले नाही. अखेर तिसऱ्या लाभार्थ्याने स्वयंस्फूर्तीने कोरोनाची लस घेतल्याने आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. लसीकरणानंतर त्या लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या टप्प्यात ६३४ जणांना देणार लस
लसीकरणासाठी लागणारे वायल्स ग्रामीण रुग्णालयात पोहोचले असून, पहिल्या टप्प्यात ६३४ लाभार्थ्यांना लस टोचली जाणार आहे. सुरुवातीला फ्रंटलाईन कर्मचारी, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, वार्डबॉय आदी लाभार्थ्यांना लस देण्यात येईल. लस घेणाऱ्या लाभार्थ्यास कोणताही आजार नसला पाहिजे. सांगोला तालुक्यातील ऑनलाईन पोर्टलवर नोंद असलेल्या १२६८ डॉक्टर, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांपैकी १११९ शासकीय आरोग्य कर्मचारी व १४९ खासगी आरोग्य कर्मचारी आहेत. त्यापैकी ६३४ जणांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे.