४० ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:21 AM2020-12-29T04:21:51+5:302020-12-29T04:21:51+5:30

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फंडातून ७० लाख ५८ हजार रुपये खर्चून हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. ठेकेदाराकडून सदर ...

Commencement of installation of high mast lights at 40 places | ४० ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचा शुभारंभ

४० ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचा शुभारंभ

Next

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फंडातून ७० लाख ५८ हजार रुपये खर्चून हायमास्ट दिवे बसविण्यास मंजुरी मिळाली आहे. ठेकेदाराकडून सदर ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्याचे काम सुरू झाले आहे. वझरे गावात हायमास्ट दिवा बसवून कार्यान्वित केला आहे. लवकरच उर्वरित मंजुरीच्या ठिकाणी हायमास्ट दिवे बसवून रात्रीचा अंधार दूर केला जाणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

येथे बसविणार हायमास्ट दिवे

आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सन २०२०-२१ फंडातून सांगोला तालुक्यातील कडलास, अकोला, वासुद, वाटंबरे, अजनाळे, लिगाडेवाडी, यलमार मंगेवाडी, चिणके, वझरे, चिकमहूद, पाचेगाव खुर्द, वाढेगाव, आलेगाव, मेडशिंगी, घेरडी, सोनंद, कोळा, हातीद, तिप्पेहळी, एखतपूर, जवळा, मांजरी, शिवणे, वाकी-घेरडी, मेथवडे याचबरोबर सांगोला शहरातील टेलिफोन ऑफिसजवळ, चिंचोलीरोड बगीचा, कुंभार गल्ली, मुंगी पीर दर्गा, कचेरीरोड, अंबिका मंदिर, नेहरू चौक, मुस्लीम स्मशानभूमी, पाटील वस्ती, परीट गल्ली, सटवाई मंदिर, कोष्टी गल्ली आदी ४० ठिकाणी हायमास्ट दिवे बसविण्यात येणार आहेत.

Web Title: Commencement of installation of high mast lights at 40 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.