जामगाव उपकेंद्रावर लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:26 AM2021-08-28T04:26:00+5:302021-08-28T04:26:00+5:30
कुसळंब : बार्शी तालुक्यातील जामगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागात चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ...
कुसळंब : बार्शी तालुक्यातील जामगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ग्रामीण भागात चिखर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जामगाव येथील आरोग्य केंद्रातील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी आर्थिक शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे उपकेंद्रात लसीकरण परवानगी मिळाली आहे. जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी रक्षाबंधनचे औचित्य साधून भाऊबीज म्हणून फक्त महिलांसाठी विशेष लसीकरण घेण्याचे आवाहन केले होते. त्याचे औचित्य साधून ग्रामपंचायत जामगाव व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी सदस्यांना लसीकरण करण्यात आले. जामगावचे सरपंच गंगुबाई जगताप, उपसरपंच विष्णू आवटे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब जाधव आणि ग्रामपंचायत सदस्य काही दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले. तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे यांचा गावक-यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आरोग्य विभागातील संजय उपरे, आरोग्यसेवक के. एन. गायकवाड, आरोग्यसेविका एम. एम. जाधवर यांचा सरपंच गंगुबाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक रणजित माळवे, अमर ठोंबरे, प्रिया गडदे, प्रियंका गडदे, शीतल अडसूळ, अनुराधा कागदे, बालाजी कागदे, नितीन आवटी, आकाश जगताप, गुणवंत खुरुंगळे, विपुल खंडागळे, बजरंग गडदे, राजेंद्र अडसूळ, पांडुरंग यादव उपस्थित होते.
---------
फोटो : २७ जामगाव
जामगाव उपकेंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.