चिंचोलीकाटीत पाणंद रस्ता खुला करण्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:24 AM2021-03-23T04:24:02+5:302021-03-23T04:24:02+5:30
या कार्यक्रमास तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार लीना खरात, भाग्यश्री भोसले, भारत अलदर, अनिल भोसले, राजेश पाटील, महेंद्र वाघमारे, ...
या कार्यक्रमास तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार लीना खरात, भाग्यश्री भोसले, भारत अलदर, अनिल भोसले, राजेश पाटील, महेंद्र वाघमारे, दादासाहेब नागणे, चंद्रकांत नागणे, महेश भोसले, प्रताप अलदर, अजिज शेख, सचिन अलदर आदी सहप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी महाराजस्व अभियानांतर्गत अतिक्रमणित झालेले रस्ते खुले करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार चिंचोलीकाटी गावठाण ते अकोले काटी या रस्त्यावरील काटेरी झाडे काढण्याचे काम महसूल विभागाकडून लोकसहभागातून करण्यात आले. याचा २१ शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या दरम्यान प्रभारी प्रांत आधिकारी गजानन गुरव यांनी या कामास भेट देऊन पाहणी केली. रस्ता खुला करण्यासाठी मंडळ अधिकारी धैर्यशील जाधव, तलाठी वामन जाधव, मुशीर हकीम, ग्रामसेवक एस.पी. पाटील, पोलीसपाटील उत्तरेश्वर पाटील, प्रशांत पाटोळे महेश काळेसह नागरिक उपस्थित होते.