गुणगौरव सोहळा चांगल्या कार्यासाठी प्रेरक माध्यम : माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:23 AM2021-09-19T04:23:29+5:302021-09-19T04:23:29+5:30
या सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी परीक्षा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, कोरोना काळात सक्रिय राहून ज्यांनी सेवा ...
या सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी, बारावी परीक्षा, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, कोरोना काळात सक्रिय राहून ज्यांनी सेवा केली असे कोविड योद्धे, आशा वर्कर, शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने कामती पोलीस स्टेशनच्या ग्राम सुरक्षा दलासाठी लागणारा सायरन भेट देण्यात आला.
यावेळी दूध संघाचे संचालक दीपक माळी, मोहोळ पं.स. सदस्य अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने, हरिभाऊ आवताडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. हरकूड, तानाजी राठोड, उपसरपंच दीपक काटकर, माजी सरपंच शुभांगी माने, माजी उपसरपंच अंबादास मोटे, ग्रामपंचायत सदस्य छणू फुलसगर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, सोसायटीचे चेअरमन संजय माळी, मोहन खटके, मंडळाचे अध्यक्ष रोहित माने, सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.