शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:28 AM2021-09-17T04:28:04+5:302021-09-17T04:28:04+5:30
मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली ८५ अ प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, यासह अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ...
मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली ८५ अ प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत, यासह अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अद्यापही काही गावांमधील शेतकऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत, ते शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे. यासह मोहोळ तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची प्रलंबित कामे वेळोवेळी मार्गी लावून सर्वसामान्य जनतेस होणारा त्रास कमी करावा, अशी मागणीही बाळराजे पाटील यांनी केली. यावेळी निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, नायब तहसीलदार लीना खरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, मदन पाटील, संभाजीराजे चव्हाण, अशोक चव्हाण, शुक्राचार्य हावळे, काकासाहेब पवार, दत्ता पवार, हेमंत गरड, अमित पाटील आदी उपस्थित होते.
.............
फोटो : बाळराजे पाटील
160921\img-20210916-wa0086.jpg
मोहोळ तालुक्यातील नागरिकांची ८५ अ च्या प्रकरणासह नागरिकांची प्रलंबित सर्व कामे मार्गी लागून अतिवृष्टी मधील उर्वरित शेतकऱ्यांचे नुकसानभरपाईचे अनुदान तात्काळ यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी केले