अतिवृष्टी, महापुराची नुकसानभरपाई मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:45+5:302021-02-09T04:24:45+5:30

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. शिवाय भीमा नदीला आलेल्या महापुरामुळेही घरे, दुकाने, शेती, ...

Compensation for excess rains and floods should be provided | अतिवृष्टी, महापुराची नुकसानभरपाई मिळावी

अतिवृष्टी, महापुराची नुकसानभरपाई मिळावी

Next

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पंढरपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. शिवाय भीमा नदीला आलेल्या महापुरामुळेही घरे, दुकाने, शेती, पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले. मात्र, मदत देताना प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सदर नुकसानभरपाईची रक्कम तहसीलच्या खात्यात जमा असतानाही शेतकऱ्यांना देण्यास दिरंगाई होत आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना ती रक्कम त्वरित मिळावी, या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नायब तहसीलदारांना दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, विभागप्रमुख अक्षय महानवर, सोशल मीडियाचे अप्पा चोरमले आदी उपस्थित होते.

फोटो ओळी ::::::::::::::

नायब तहसीलदारांना निवेदन देताना सचिन पाटील, धनंजय पाटील, तानाजी बागल, अक्षय महानवर आदी.

Web Title: Compensation for excess rains and floods should be provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.