ऑक्सिजन वाढविण्यासाठी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:25+5:302021-09-13T04:21:25+5:30
बार्शी : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी अनेकांचा बळी गेला आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी तसेच ऑक्सिजनची गरज किती महत्त्वाची आहे ...
बार्शी : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी अनेकांचा बळी गेला आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण व्हावी तसेच ऑक्सिजनची गरज किती महत्त्वाची आहे हे पटवून देण्यासाठी पोलीस भरतीची तयारी करीत असलेली शालेय तरुणी अमू जठार हिने लॉकडाऊनच्या काळात सुमारे २५० झाडे नागरिकांना मोफत वाटप केली.
२१ मे रोजी सहकारी मैत्रीण पूजा वाघमारे, क्रांती शिंदे व नवनाथ सुर्वे यांच्या मदतीने गेली दोन महिने आंबा, सीताफळ, तुळस, पिंपळ, जासवंत, पेरू, कडिपत्ता, चिकू यांसह विविध झाडांची लागवड केली. गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधत ५० झाडे शहर हिरवेगार व्हावे यासाठी ध्यास घेतलेल्या वृक्ष संवर्धन समिती व जाणीव फाउंडेशन या दोन संस्थांना, तर उर्वरित २०० झाडे भगवंत मैदान येथे गणेशमूर्ती घ्यायला आलेल्या भक्तांना मोफत वाटप केली.
यावेळी प्रसन्नदाता गणेश मंडळाचे बंडू माने, हर्षल रसाळ, गणेश घोलप, पाणीपुरवठा सभापती भैया बारंगुळे, चित्रकार महेश मस्के, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर राऊत, उद्योजक नागेश सुरवसे, सतीश राऊत, प्रदीप हागरे, उमेश देशमाने, धनाजी मोरे, हेमंत शाहीर उपस्थित होते.
---
फोटो : १२ अमू जठार
ऑक्सिजन वाढविण्याचा संकल्प ठेवत झाडे वाटप करताना अमू जठार, पूजा वाघमारे, क्रांती शिंदे, बंडू माने, हर्षल रसाळ.