संजय क्षीरसागर विरोधातील तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:27 AM2021-09-15T04:27:19+5:302021-09-15T04:27:19+5:30

जात पडताळणी समितीकडून निकालात लोकमत न्यूज नेटवर्क मोहोळ : भाजप नेते संजय क्षीरसागर यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य ...

Complaint against Sanjay Kshirsagar | संजय क्षीरसागर विरोधातील तक्रार

संजय क्षीरसागर विरोधातील तक्रार

googlenewsNext

जात पडताळणी समितीकडून निकालात

लोकमत न्यूज नेटवर्क

मोहोळ : भाजप नेते संजय क्षीरसागर यांच्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे व काँग्रेस आयचे गौरव खरात यांनी दाखल केलेली तक्रार जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने ९ सप्टेंबरला निकालात काढल्याची माहिती संजय क्षीरसागर यांनी दिली.

भाजप नेते संजय क्षीरसागर यांनी मोहोळच्या तहसीलदारांकडून दाखला मिळालेला असताना उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. १ यांच्याकडून दुसरा जातीचा दाखला मिळविला आहे. कुटुंबातील पूर्वीचा जातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती पडताळणी समितीला न देता माहिती लपवून दुसरा जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र बेकायदेशीरपणे मिळविल्याचा आरोप केला गेला. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांनी २४ मे २०२१ रोजी संजय क्षीरसागर यांचा जातीचा व वैधता दाखला रद्द व जप्त करण्याची मागणी जिल्हा जातपडताळणी समितीकडे केली होती. यासंदर्भात जातपडताळणी समितीपुढे सुनावणी सुरू होती.

त्या सुनावणीत महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्ग अधिनियम २००० चे कलम ७(२) नुसार समितीने घेतलेला निर्णय अंतिम असून त्यास भारतीय संविधानातील कलम २२६ अन्वये उच्च न्यायालयात याचिकेद्वारे दाद मागता येते, अशी तरतूद आहे. त्यामुळे समितीने घेतलेल्या निर्णयांमध्ये पुनर्विलोकनाची तरतूद नसून तसे समितीस अधिकार नाहीत, असे निरीक्षण नोंदवत जिल्हा जातपडताळणी समितीने तक्रारदार शिवाजी सोनवणे व गौरव खरात यांचा तक्रारी अर्ज ९ सप्टेंबर २१ रोजी निकालात काढली.

---

मी माझ्या सन १९०४ पासूनचे सख्खे पणजोबाचे जमिनीचे खरेदी खत, गहाणखत, त्यासंबंधी महसूली फेरफार, कडई पत्रक, सख्खे आजोबा, त्यांच्या बहिणींचे जन्म व मृत्यू दाखले पुरावे दिले. समितीने यापूर्वीच गृह चौकशी करून मला जातवैधता प्रमाणपत्र दिले आहे. ९ सप्टेंबर २१ रोजी समितीने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो.

- संजय क्षीरसागर

भाजप नेते, मोहोळ

Web Title: Complaint against Sanjay Kshirsagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.