नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी सांगोला नगरपालिकेत तक्रार पेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:28 AM2021-09-08T04:28:01+5:302021-09-08T04:28:01+5:30
सांगोला नगरपालिकेचे क्षेत्र जवळपास ६८ चौरस किलोमीटर असून, शहरासह अनेक हद्दवाढ भाग, वाड्या-वस्त्यांचा यात समावेश आहे. हद्दवाढ परिसर व ...
सांगोला नगरपालिकेचे क्षेत्र जवळपास ६८ चौरस किलोमीटर असून, शहरासह अनेक हद्दवाढ भाग, वाड्या-वस्त्यांचा यात समावेश आहे. हद्दवाढ परिसर व वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेले मालमत्ताधारक नगरपालिकेला वेळेवर करदेखील भरत आहेत. मात्र शहरासह हद्दवाढभाग, वाड्या-वस्त्यांवर रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, स्वच्छता, घंटागाडी, गटारी यासह इतर समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, अडचणी, समस्या असतील त्या लेखी निवेदनाद्वारे सांगोला नगरपालिकेतील एक खिडकी विभागात नागरिकांनी दिल्या आहेत.
मात्र त्या-त्या विभागाकडून या समस्यांचे निवारण होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. प्रशासनाच्या ासमन्वयाअभावी नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचे निवारण होत नसल्यामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे सांगोला नगरपालिकेच्या एक खिडकी विभागाजवळच नागरिकांसाठी स्वतंत्र तक्रार पेटी बसवून तक्रार पेटीतील आलेल्या तक्रार, निवेदनाची तातडीने दखल घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे नगरसेवक सोमेश यावलकर यांनी सांगितले.
----