नवीन कायद्यानुसार बायकोची नवऱ्याविरुद्ध तक्रार; अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा
By दिपक दुपारगुडे | Updated: July 3, 2024 19:22 IST2024-07-03T19:22:03+5:302024-07-03T19:22:35+5:30
नवऱ्याने मोबाइलवर बायकोला शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे तक्रार

नवीन कायद्यानुसार बायकोची नवऱ्याविरुद्ध तक्रार; अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा
दीपक दुपारगुडे, सोलापूर: भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार नवऱ्याने मोबाइलवर बायकोला शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या तक्रारीवर नवऱ्याविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपासून भारतीय संसदेत जुन्या कायद्यात बदल करून पारीत झालेल्या नवीन कायद्याचा अंमल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पारू गोपाळ पवार (रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) यांनी १ जुलै २०२४ रोजी त्यांच्या मोबाइल नंबरवर गोपाळ बाबू पवार याने शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार दिली. यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ (बीएनएस)चे कलम ३५१ (४) प्रमाणे गोपाळ पवार विरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात पहिला अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा पोलिस हवालदार ठोंबरे यांनी दाखल करून पुढील कारवाईसाठी पोलिस हवालदार अभिजीत कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे.