बाजार समितीचे चिंतामणी जगताप यांचे संचालकपद रद्द करण्याची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:16 AM2021-07-21T04:16:15+5:302021-07-21T04:16:15+5:30

शंभुराजे जगताप यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांच्याकडे सन २००० पासून ७० ...

Complaint to the District Deputy Registrar for cancellation of the post of Director of the Market Committee Chintamani Jagtap | बाजार समितीचे चिंतामणी जगताप यांचे संचालकपद रद्द करण्याची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

बाजार समितीचे चिंतामणी जगताप यांचे संचालकपद रद्द करण्याची जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार

Next

शंभुराजे जगताप यांनी दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी जगताप यांच्याकडे सन २००० पासून ७० बाय ४० आकारमानाचा बाजार समितीचा भूखंड भाडेपट्ट्याने आहे. त्यांनी बाजार समितीशी प्रत्यक्ष भाडेकरार केला असल्यामुळे व थकबाकीदार असल्यामुळे ते संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करावे, असा अर्ज ॲड. कमलाकर वीर यांच्यामार्फत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्याकडे दाखल केला आहे. त्याची सुनावणी २९ जुलैला सोलापूर येथे होणार आहे.

-----

माझ्याकडे कोणताही भूखंड नाही.

सदरचा प्लॉट १९९९ साली सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अधिग्रहण झालेला आहे. त्यामुळे तो प्लॉट माझ्याकडे असल्याचा प्रश्नच येत नाही. याबाबत मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही. याउलट प्रतापराव जगताप यांनी जयवंतराव जगताप यांना अपात्र ठरविण्याबाबत दिलेल्या तक्रारीचा निर्णय उपनिबंधकाने जो दिला तो प्रतापराव यांना अमान्य असल्याने त्यांनी याप्रकरणी विभागीय सहनिबंधक पुणे यांचेकडे अपील केले आहे. त्याची सुनावणी २८ जुलैला आहे. कदाचित जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने ही तक्रार केली असेल. त्याला आपण सामोरे जाऊ.

- चिंतामणी जगताप, उपसभापती, बाजार समिती करमाळा.

----

Web Title: Complaint to the District Deputy Registrar for cancellation of the post of Director of the Market Committee Chintamani Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.