मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार वाढल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:01 AM2021-02-20T05:01:46+5:302021-02-20T05:01:46+5:30

मोहोळ : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण मतदारांच्या तुलनेत ५,२५५ मतदार वाढलेले दिसत आहेत. एकूण ३० टक्के मतदारांची ...

Complaint of increase in bogus voters on the backdrop of Mohol Municipal Council elections | मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार वाढल्याची तक्रार

मोहोळ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस मतदार वाढल्याची तक्रार

Next

मोहोळ : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण मतदारांच्या तुलनेत ५,२५५ मतदार वाढलेले दिसत आहेत. एकूण ३० टक्के मतदारांची संख्या वाढली असून, यात परगावातील अनेक मतदारांची बोगस पद्धतीने नोंदणी झालेली आहे. मोहोळ शहराबाहेरील असलेले मतदार शोधून त्यांची नावे कमी करून नवीन मतदार यादी प्रसिद्ध करावी तसेच याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अन्यथा २३ फेब्रुवारी रोजी मोहोळ तहसील कार्यालयावर जनमोर्चा काढण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत बारसकर यांनी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. मोहोळ शहरामध्ये नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत २०१६ साली मतदार संख्या ही केवळ १७,३८६ इतकी होती. २०१९च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची संख्या वाढून २०,१७५वर पोहोचली.

सन २०१६च्या तुलनेत २०२१च्या मतदार संख्येत ५,२५५ (३० टक्के) इतकी वाढ झाली आहे. भाग क्रमांक ९०, ९१, ९५, १०७, ९९, १००, ११३, १०२, ९३, ९८ या भागात मतदार वाढले आहेत.

तसेच भाग क्र. १११, ८८, १०५, १०६, ९०, ९४, ९७, १०१, १०३, १०४, १०८, ८९, ११२, ९२, ९६ या सगळया भाग क्रमांकामध्ये ३ ते ४ टक्के मतांची वाढ झाली आहे. वार्ड क्र. २, ३, ५, ६, ७, ८,९,१२, १४, १६, १७ या वार्डामध्ये अधिकची मते बोगस नोंदवण्यात आली आहेत.

या शिष्टमंडळात नगरसेवक अतूल क्षीरसागर, जितेंद्र अष्टूळ, शिलवंत क्षीरसागर, रमेश सनगर, बाळासाहेब माळी, सुलतान पटेल, रवी थोरात, सिद्घार्थ एकमल्ले हे सहभागी झाले होते.

---

मोहोळ नगर परिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारुप यादीवर कोणाची हरकत असेल तर हरकत नोंदवावी . त्यानुसार पुढील चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- जीवन बनसोडे, तहसीलदार

----

फोटो : १८ मोहोळ

पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मोर्चेचे निवेदन देताना माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर , नगरसेवक अतूल क्षीरसागर, जितेंद्र अष्टूळ, शिलवंत क्षीरसागर

Web Title: Complaint of increase in bogus voters on the backdrop of Mohol Municipal Council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.